बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 6

  • 11.3k
  • 1
  • 5.8k

६. सुरवात... लाल महालात येऊन बहिर्जी आता चांगलाच रुळला होता. वाड्याच्या जवळच त्याला एक खोली देण्यात आली. मित्रांच्या ओळखी होऊ लागल्या. सवयी, स्वभाव माहित होऊ लागले. विटीदांडू, सूरपाट्या, सूरपारंब्या, लगोरी, हुतूतू, कुस्तीचे डाव सकाळ संध्याकाळ रंगू लागले. त्याचबरोबर तलवारबाजी, भाले, बरचे, दांडपट्टा, विटा, तिर कमान अशा ना नाविध शास्त्रांचे हात होऊ लागले. सकाळ संध्याकाळ नदीच्या काठी दाट झाडीमध्ये कसून सराव होऊ लागला. कुस्तीचे डाव रंगू लागले. सोबतीला व्यायाम आणि घौडदौड त्यामुळे शरीरही आकार घेऊ लागलं. स्वराज्याविषयीचे आऊसाहेबांचे, शिवबाचे विचार मनात घर करू लागले.         दिवसाचा तिसरा प्रहार सुरु झाला होता. संध्यासमयी सूर्याच्या तांबूस सोनेरी प्रकाशाने आकाश उजळून