बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 3

(13)
  • 12.9k
  • 7.7k

३. शिकार नदीच्या मधोमध एका लहान खडकावर शंभू महादेवाचं एक प्राचीन मंदिर होतं. त्याच्या आजूबाजूला पसरलेल्या जमिनीवर लहानसहान वृक्षराईंनी वेढलेलं ते हिरवंगार छोटंसं द्वीप जणू नदीच्या पांढुरक्या निळ्या कोंदनातील पाचूच्या खड्यासारखं भासत होतं. किनाऱ्यावर असलेल्या दगडी घाटावर तिथपर्यंत जाण्यासाठी मार्गात मोठमोठाले खडकांची एकसंघ माळ होती. पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहायला लागली कि, मंदिरातल्या शंभू देवाचं दर्शन दुरापास्त होऊन जायचं. दैनंदिन जीवनात, देव कार्यात अडचण येऊ नये म्हणून गावातील लोकांनी घाटालगतच एक छोटंसं मंदिर उठवलं होतं. रोजच्या देवकर्मात येणारी बाधा दूर झाली होती. सकाळ संध्याकाळ देवालयातली घंटा महादेवाच्या आराधनेत तल्लीन होऊन जायची. तिचा टनत्कार चुहुदिशांना एक मंगलमय स्वरणाद सोडून जायचा.