बहिर्जी - स्वराज्याच्या तिसरा डोळा - 2

  • 14.4k
  • 1
  • 9k

२. दवंडी निसर्ग देवतेच्या कुशीत वसलेलं गाव, आजूबाजूला हिरव्या रंगाचा पदर ओढून सज्ज असलेल्या सह्याद्रीच्या मुशीत, बाजूनेच खळाळत वाहणाऱ्या नदीच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून निजल होत. पक्ष्यांच्या कलकलाटाने हळूहळू जागं होऊ लागलं होत. पूर्वेकडून सुर्यादेवताही आपल्या असंख्य रंगीबेरंगी कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवून टाकण्यासाठी प्रकट होऊ लागला होता. त्याच्या तांबूस सोनेरी किरणांनी अवघा भवताल उजळून टाकण्यासाठी डोंगरा आडून वर सरकत होता.         नदीपासून आणि घाटावरच्या मंदिराच्या मागच्या बाजूने अर्धा एक फर्लांग अंतरावर निंबाच्या झाडामध्ये रामोश्यांची वस्ती होती. मोजून दहा बारा घर होती. मातीच्या भिंती आणि गव्हाच्या, किंवा नदीतल्या पानगवताने शाकारलेली छप्पर असलेली,