किती सांगायचंय तुला - ६

  • 10.8k
  • 3.9k

शिवा ची कार फुल स्पीड ने रस्त्यावर धावत असते. रेडिओ स्टेशन वर मस्त जुनी गाणी सुरू असतात. शिवा लक्ष देऊन कार चालवत असतो आणि दिप्ती आपल्याच विचारात मग्न होऊन काचेच्या बाहेरील हिरवळ बघत असते. एवढ्या वेळ कोणी कोणाशीच काहीही बोलत नाही. थोड्या वेळात गाडीचा ब्रेक लागतो. अचानक झटका लागल्याने दिप्ती विचारातून बाहेर येते. "पोहचवल की नाही वेळेच्या आधी "- शिवा दिप्ती ला म्हणतो. दिप्ती चेहऱ्यावर स्मित हास्य आणत हो म्हणून मान हलवते आणि दार उघडून गाडी च्या खाली उतरते.शिवा पण लगेच तिच्या मागे गाडी बाहेर येतो. दिप्ती फॉर्मली बाय करून वळते आणि शिवा तिला हाक मारतो.तशी ती जागीच थांबते आणि मागे वळून