किती सांगायचंय तुला - ४

  • 11.4k
  • 2
  • 4.4k

गजाननाचे आगमन म्हटले की किती उत्साह, रौनक आणि प्रसन्नता असते वातावरणात आणि गजाननाच्या भक्तामधेही. तसचं वातावरण आज दिक्षित वाड्यामध्ये होते. सगळीकडे फक्त धावपळ सुरू असते. सगळी पूजेची तैयारी सुरळीत व्हावी म्हणून सगळे आपापले काम चोख पणाने करत असतात. दिप्ती रांगोळी काढण्यात मग्न असते.. ते ही फुलांच्या पाकळ्या ची. शिवा ने इको फ्रेंडली म्हटल्यावर रांगोळी पण इकोफ्रेंडली होती. हळूहळू सगळे जवळचे नातेवाईक येण्यास सुरुवात झाली असते. सयाजीराव यांचे लहान भाऊ अशोक राव आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आले असते. अशोक राव यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलगा श्रीकांत, शिवा पेक्षा काही वर्षांनी मोठा होता. आणि मुलगी काव्या शिवा पेक्षा लहान.