"ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मै जहा रहू जाहा मे याद रहे तू" दिप्ती च्या मोबाईल चा अलार्म वाजतो. तशी ती जागी होते. पहाटेचे पाच वाजले असतात. ती पटकन फ्रेश होऊन येते आणि जॉगिंग साठी बाहेर पडते. बाहेर पाऊसाची रिपरिप सुरू असते. अंधार जास्त असल्याने ती ठरवते की आधी थोडी एक्सरसाईज करू मग जॉगिंग ला जाऊ. एक्सरसाईज कुठे करायची म्हणून ती सगळी कडे बघते. तिला प्रकाश दिसतो. दिप्ती त्या दिशेने जाते. तिला एक शेड दिसतो. तिथेच हा लाईट लागलेला. ते शेड चार खांबांवर उभे होते.. शेड मध्ये चार खुर्च्या आणि त्याच्या समोर टी टेबल असतो. अगदी राजेशाही काळातली