किती सांगायचंय तुला - २

  • 12.7k
  • 4.8k

सगळ्यांची कॉफी पिऊन झाली असते. सयाजी राव दिप्ती ला म्हणतात, " कॅप्टन खूप छान होती ह कॉफी, मला आवडेल तुझ्या हातांनी बनवलेली कॉफी रोज प्यायला. करशील ना माझ्या साठी रोज?" "येस सर"- दिप्ती अगदी ऑफिसर स्टाईल मध्ये म्हणते. तसे सगळे हसतात. "चला मी रात्री च्या जेवणाच बघते"- अस म्हणून सुचित्रा ताई किचन कडे जातात. "मी पण लाइब्ररी मध्ये बसतो थोडा वेळ."- सयाजी राव. दिप्ती हातातल्या घडी कडे बघते आणि चेहऱ्यावर थोडे काळजी चे भाव आणून श्रुती कडे बघून म्हणते, " श्रुती अग सात वाजले, आपण काहीच सुरुवात नाही केली अजून. चल लवकर उठ. काय डेकोरेशन करायचं , कुठली थीम ठेवायची