काहीतरी गौडबंगाल आहे हे मात्र नक्की झालं.पण मनाच्या कोपऱ्यात त्याची काळजी वाटत होती. त्या भूत बंगल्यात परत जायची इच्छा नव्हती. पण एकदा मला माझ्या मनाची शांती हवी होती. संध्याकाळ व्हायला आली होती, झपझप पावलं टाकत मी वाड्या समोर पोहोचले. भव्य वाडा तसाच दिमाखात उभा होता. सगळीकडे शांतता पसरलेली. जोरात आवाज दिला, “हॅलो….” तसा तो आवाज चारी बाजूला घुमला.“श्री, तू आहेस का ईथे?” कसंलाच प्रतिसाद नाही. काही वेळ मी उत्तराची वाट पाहिली. छे, काही उत्तर नाही. जाऊदे मीच आत जाते. मी स्वताशीच पुटपुटले.पाठीवरची बॅग त्या चौथऱ्यावरच टाकून त्या दुमजली इमारतीच्या वरच्या खोल्यांकडे जायला लाकडी पायऱ्यांचा तो रुंद जिना चढायला लागले. जिन्यातला