गट्टू

(13)
  • 8.6k
  • 2.4k

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून रामराव आणि माझी काही भेट झाली नव्हती. कालच एका मित्राकडून त्यांच्या आजारपणाबद्दल कळले. मनात विचार आला की जाऊन रामरावांना बघून यावे. तसं म्हंटल तर रामराव आणि माझी ओळख रेल्वे प्रवासात झालेली. पण आवडी-निवडी सारख्या असल्याने आम्ही थोड्याच दिवसात चांगले मित्र झालो. रामरावांना एकच मुलगा. एका जपानी कंपनीत कामाला लागला आणि काही दिवसातचं कंपनीतर्फे जपानला गेला. कंपनीने चांगलं पँकेज दिल्यामुळे साहजिक रामरावांच्या मुलाने, म्हणजे मनोहरने जपानलाच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. रामरावांना निवृत्त व्हायला दोन वर्ष शिल्लक होती. जपानला मुलासोबत राहणे रामरावांना पटत नव्हते. त्यामुळे ते व त्यांची पत्नी ठाण्यात घोडबंदर रोड येथे रहात होते. लॉक डाऊनमुळे माझंही घरूनचं