सुटका पार्ट 11

  • 9.8k
  • 1
  • 3.9k

बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला.“रात्र रात्र ओरडायचो, अंगावर करंट झेलले, वारंवार दिलेल्या शिक्षेनी मी खूप हळवा झालो होतो. दोन वर्षांनी घरी आलो तेव्हा मात्र मी भूतकाळ मागे ठेवला. आई ने कधी माझ्या शिक्षणासाठी कुठली कमी ठेवली नाही. पण या सगळ्यात ती थकली होती. माझ्या आजारपणा मुळे आम्हाला सतत घर बदलत राहावी लागायची. लोकं नको नको ते बोलायचे. चेटूक - करणी करतात ही लोकं असं म्हनून छि थू करायचे. माझं शिक्षण हे असंच झालं. काही इथे काही तिथे. मुंबईला गेलो तिथे तीन वर्षे काढली. सगळ्यांना आम्ही आमची खोटीच ओळख द्यायचो मग जास्त विचारपूस झाली तरी उत्तर ठरलेली असायची. तुम्हाला सांगितलेलं