तुझाच मी अन माझीच तू...भाग २६

  • 12.2k
  • 5.8k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २६ रायन कधी नव्हे ते एकदम चांगला वागला होता. त्याने नकळत आभा शी सगळे शेअर सुद्धा केले होते. पण अरायण खर तर असा कधीच नव्हता.. ही मे बी ही आभा ची जादू होती पण स्वतःच्या वागण्यामुळे रायन जरा अस्वस्थ झाला होता. स्वतःचे असे वागणे त्याच्यासाठी सुद्धा सरप्राईजिंग वाटत होते..आपण चुकीचे वागलो असं राहून न राहवून त्याला वाटत होते.. त्यामुळे रायन ची आभा च्या डोळ्यात पहायची हिम्मत होईना.. पण आता आभा काय बोलणार ह्याकडे रायन चे लक्ष लागून राहिले होते. आभा जरा वेळ शांत होती.. ती काहीतरी विचार करतीये हे रायन ला जाणवले होते.. त्यामुळे