शामूसाठी आजची सकाळ विशेष होती. तीन महिन्यांनंतर तो आज आपल्या धंद्यावर निघाला होता. बुटपॉलिशचा खोका, वेगवेगळ्या पॉलिशच्या डब्या, ब्रश , जुनी फडकी असे साहित्य गोळाकरून तो जायला तयार झाला. त्याची बायको शांती हे सगळ कौतुकाने बघत होती. तिने घाई घाईने काळसर चहा कपात ओतला व रात्रीची एक शिळी चपाती त्याला खायला दिली. शामूने पांचट-काळ्या चहासोबत घाईत चपाती खाल्ली व तो आपल्या झोपड्याच्या बाहेर पडला. तेवढ्यात शांतीने आवाज दिला, “ अवं बंटीचं बाबा ! ऐका की! “शांतीच्या आवाजाने शामू थांबला. तिने एक जुना साडीचा कपडा शामूला दिला व म्हणाली, “ अवं ये तोंडाला बांधा नायतर हवालदार रट्ट दिलं. “ शामू बायकोच्या मस्करीने