जैसे ज्याचे कर्म - 7

  • 9.4k
  • 2.9k

जैसे ज्याचे कर्म! (भाग ७) छाया! श्रीमंत आईबापाची एकुलती एक लाडात वाढलेली हट्टी मुलगी! तिने एखादी गोष्ट मागावी आणि ती तिला न मिळावी असे कधीच होत नसे. किंबहूना एखादे वेळी आईबाबांकडून नकार मिळणे तर सोडा पण तशी शक्यता दिसताच ती आकाशपाताळ एक करायची. डॉ. गुंडे शहरातील एक प्रतिथयश आणि तितकेच श्रीमंत असे डॉक्टर! छाया जसजशी मोठी होत गेली तसतसे तिच्या आईचे लक्ष तिच्यावरून कमी होत गेले. दिवस दिवस त्या दोघींची भेट होत नसे. तिची आई सतत बाहेर असायची. अनेक संस्था, मैत्रिणींचे