जैसे ज्याचे कर्म - 4

  • 9.2k
  • 3.6k

जैसे ज्याचे कर्म! (भाग ४) डॉ. गुंडे विचारात गुंतलेले असताना टेबलावरील युवतीची स्वच्छता करणारी नर्स म्हणाली, "डॉक्टर पे..पे..पेशंट..." "काय झाले?" नर्सचा कंपायमान आवाज ऐकून डॉक्टरांनी विचारले. "बघा ना, कशी अस्वस्थ वाटतेय, डोके हलवतेय. गळ्यातून वेगळाच आवाज येतोय. हातपाय ताठ करतेय..." नर्स बोलत असताना डॉ. गुंडे टेबलाजवळ आले. त्यांनी मुलीची नाडी पाहिली. ती व्यवस्थित होती. तितक्याच त्यांचे लक्ष मुलीच्या चेहऱ्याकडे गेले. चेहऱ्यावर बांधलेला रुमाल पाहून ते म्हणाले, "असे का करतीय ही? नाडी तर व्यवस्थित आहे. मग घाबरल्यासारखी का करतीय? आजपर्यंत मी एवढ्या गर्भपाताच्या