जैसे ज्याचे कर्म - 2

  • 10k
  • 4.4k

जैसे ज्याचे कर्म! (भाग २) "साहेब... साहेब..." गणपतने पुन्हा आवाज दिला. तसे डॉ. गुंडे वास्तवात परतले. समोरच्या रुमालाने त्यांनी कपाळावरचा घाम पुन्हा एकदा टिपला. ते पाहून गणपतने विचारले,"काय झाले साहेब? तब्येत बरी नाही का? नाही म्हटलं सारखा घाम येत आहे... ए. सी. चालू असताना घाम येणे बरे नाही.""तसे काही नाही रे. तब्येत चांगली आहे पण का कोण जाणे आजची केस हातात घेतल्यापासून कशी वेगळीच मनःस्थिती झाली आहे. गणपत, तुला इथे काम करुन किती वर्षे होत आहेत रे?""कुणी मोजली साहेब?