जैसे ज्याचे कर्म - 1

  • 12k
  • 5.7k

जैसे ज्याचे कर्म! (भाग १) डॉ. गुंडे यांच्या प्रशस्त, टोलेजंग दवाखान्यातील भव्य वातानुकूलित शस्त्रागारामध्ये एका वीस वर्षीय युवतीवर गर्भपाताची शस्त्रक्रिया आटोपून डॉ. गुंडे यांनी हातमोजे, चेहऱ्यावरील मास्क काढला. कोपऱ्यामध्ये असलेल्या बेसीनमध्ये हात स्वच्छ धुतले. बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसून त्यांनी जवळच असलेल्या भिंतीतले कपाट उघडले. कपाटातील एक रजिस्टर काढताना त्यांना जाणवले की, ते त्या शस्त्रक्रियेच्यावेळी नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हते. त्या युवतीजवळ गेल्यापासूनच एक विचित्र जाणीव त्यांच्या शरीरामध्ये पसरली होती. वातानुकुलित दालन असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. खिशातील रुमाल काढून त्यांनी घाम