नभांतर : भाग - ४

  • 7.9k
  • 1
  • 3.8k

भाग – ४ सहा सात वर्षापूर्वी....... असाच तो गॅलरी मध्ये एकटाच बसला होता. तसा तो एकटाच असायचा. पण आज त्याला एकटेपणाची जाणीव होत होती. झालेले प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यासमोरून जात होते आणि विशेषकरून त्यातील मन दुखवणारे प्रसंग तर हल्लीच्या मालिकांमध्ये जसे एका विशिष्ट प्रसंगी एकच शॉट ३ – ४ वेळा कॅमेराचा अँगल बदलून दाखवतात त्याप्रमाणे “ते” विशिष्ट प्रसंग २ – ३ वेळा त्याच मन त्याला दाखवत होत. तो खूप प्रयत्न करत होता हे सर्व विसरण्याच पण.. हा पण जिकडे येतो ना तिकडे सगळ पणाला लावायला लावतो.. पण त्याला ते विसरता येण अशक्य होतं. सानिका पुन्हा असं वागेल