नभांतर : भाग - ३

  • 8.9k
  • 4.1k

भाग – ३ दुसऱ्या दिवशी चहा पिताना सर्वांची गप्पांची मैफिल रंगली. कुणालाही कसलीही गडबड नव्हती त्यामुळे सगळे अगदी निवांत बसले होते. थोडेच पाहुणे उरले होते मात्र तरीसुद्धा गप्पांना ऊत येत होता. सर्वांच्या चर्चेचे एकच केंद्र होते ते म्हणजे हे लग्नकार्य ! “अगदी आदर्श म्हणाव इतक छान झाल ! ना वारेमाप पैसा खर्च केला, ना अन्नाची नासाडी केली. पण भाऊजी तुम्हाला सुचल तरी कसं हो एवढ परफेक्ट ?” तसे आकाशचे बाबा म्हणाले, “ह्या मागच सगळ डोक याचच आहे !” आकाश कडे हात दाखवत ते म्हणाले. “व्वा ! पोरग भारी हुशार निघाल तुमचं !” असे कौतुकाचे बोल कानी आले. “मग कालची