नभांतर : भाग - १

(12)
  • 13.1k
  • 5.9k

भाग - १ संध्याकाळी साधारण 5 ची वेळ... अनु लगबगीने मुख्य रस्ता ओलांडून रिक्षा स्टॉप पाशी पोहोचली. संध्याकाळची वेळ असल्यामुळे वातावरणात सुद्धा तितकीच लगबग जाणवत होती. सूर्यास्ताची वेळ जवळ आल्याने पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतण्यास उत्सुक होते; अगदी त्याचप्रमाणे शाळेतून घरी परतणारी मुले, दिवसभर ऑफिसमध्ये कामाच्या ओझ्याखाली दबून गेलेली सर्वजण सुद्धा आपापल्या घराकडे तितक्याच लगबगीने परतत होते. कोणी बस तर कोणी गाडी असे करत मार्गक्रमण करत होते. परंतु अनुला मात्र घरी परतण्याची घाई अजिबात नव्हती. उलट तीच घरातून लगबगीने बाहेर पडली होती आणि तिला वेळ अजिबात दवडायचा नव्हता. त्यामुळे तिने रिक्षेला प्राधान्य देत ती इथे आली होती. “सहारा हॉस्पिटल कडे