संतश्रेष्ठ महिला भाग १५ यात पुढील नाव येते ते संत सोयराबाई यांचे यमाजी आणि हौसा या जोडप्याची ही मुलगी. मंगळवेढ्याजवळच्या लहानशा गावातली. काळी-सावळी, टपोऱ्या डोळ्यांची, समंजस, शालीन, चाणाक्ष सोयरा हीला चोखोबांच्या आईनं हेरली आणि सून म्हणून घरात आणली. चोखोबा प्रथम पासून नामदेव भक्त असल्याने चोखोबा आणि सोयराच्या लग्नाला संत नामदेव आले होते. आपल्या नवऱ्याचं वेगळेपण, विठ्ठलावरचं त्याचं अपार प्रेम, नामदेवांच महात्म्य, नामदेवांची चोखोबांवर असणारी माया हे सगळं कळण्याचं सोयराचं तेंव्हा वय नव्हतं. पण हे सगळं काहीतरी वेगळं आहे हे कळण्याचा चाणाक्षपणा मात्र तिच्यात होता. सोयरा सुगृहिणी होती. गृहकृत्यदक्ष सुद्धा होती. आपला चार गाडग्या-मडक्यांचा खोपटातला संसार तिने चांगला आणि नेटका