संतश्रेष्ठ महिला भाग १२

  • 6.9k
  • 2.4k

संतश्रेष्ठ महिला भाग १२ यानंतर नाव येते ते राजस्थान मधील श्रेष्ठ संत मीराबाई यांचे संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत आपल्याकडे अनेक संत महात्मे होऊन गेले. या सगळ्यांनी मराठीतील भक्तीसाहित्य समृद्ध केलेले आहे. पण मराठी भाषेशिवाय इतर भाषातही त्या त्या प्रांतातील संत महात्म्यांनी प्रचंड साहित्य निर्मीती केलेली आहे. मग ते संत तुलसीदासांचे 'तुलसी रामायण' असो, सुरदासाचे काव्य असो, कबीर्-रहिमचे दोहे असोत वा मीरेची पदे असोत. या सगळ्यांनीच भारतीय संत साहीत्याला एका विलक्षण उंचीवर नेलेले आहे. मात्र यापैकी संत कबीर आणि संत मीराबाई या दोघांचे आयुष्य अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे आहे . कबीर अतिशय सामान्य घरात वाढले, त्यांच्यासमोरच्या समस्या वेगळ्या होत्या तर मीरा राजघराण्यात