संतश्रेष्ठ महिला भाग ११

  • 7.8k
  • 2.5k

संतश्रेष्ठ महिला भाग ११ यानंतर नाव या परंपरेत येते संत वेणाबाई यांचे .. जवळपास श्रीकृष्णाला उद्देशुन लिहीलेल्या 1200 ते 1300 रचना आजही त्यांच्या भगवद्भक्तिची साक्ष देतात. संत वेणाबाई यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये झाला. त्या मुळच्या मिरज येथील देशपांडे यांच्या कन्या. विवाहानंतर कोल्हापूरला गेल्या व काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी विधवा झाल्या. कोल्हापूर हे त्यांचे माहेर तर मिरज हे सासर होते. ‘धन्य वेणाई वेणुमोहित ! वेणुविण गाय सप्रेमयुक्त !! सतराव्या शतकाचा प्रारंभ (सन १६२७) म्हणजे सामाजिक परिस्थिती कशी असेल हे काही वेगळं सांगायला नको. कोल्हापूरचे देशपांडे-साधेसुधे सश्रद्ध धर्मप्रवण पण सुशिक्षित कुटुंब. प्रथेप्रमाणे लाडक्या लेकीचा विवाह बालपणीच करून दिला. पण मुलीला