संतश्रेष्ठ महिला भाग ८

  • 7.2k
  • 2.4k

संतश्रेष्ठ महिला भाग ८ चंद्रभागा नदी पाहिल्यावर वारकरी म्हणाले किती जन्माचे पुण्य म्हणून तुझे पंढरपुरास पाय लागले आहेत . ही समोर दिसते ती “पापनाशक” चंद्रभागा नदी आणि हे समोरचे मंदिर विठ्ठलाचे आहे . असे म्हणताच तिने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले , नामदेव पायरीचे दर्शन घेऊन धावतच विठ्ठ्ल मंदिरात शिरली. मंदिरातील सोळा खांबाजवळ उभे राहून तिने देवाचे डोळे भरून रूप पाहिले . आणि त्याला लोटांगण घातले . आपल्या जीवनाचे सार्थक झाले म्हणून भजन गाऊन नाचू लागली . यानंतर ती पंढरपुरात राहिली आणि विठ्ठल भक्तीमध्ये रमून गेली . इकडे काही दिवसांनी ठाणेदाराचे पत्र बादशाहाला मिळाले