संतश्रेष्ठ महिला भाग ७

  • 8.8k
  • 2.6k

संतश्रेष्ठ महिला भाग ७ या परंपरेतील तिसरे नाव आहे संत कान्होपात्रा नको देवराया अंत आता पाहु। प्राण हा सर्वथा जावू पाहे।। हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले। मजलागी जाहले तैसे देवा।। तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धावे वो जननी विठाबाई।। मोकलूनी आस झाले मी उदास। घेई कान्होपात्रेस हृदयास।।” ही संत कान्होपात्रा यांची ही रचना फार प्रसिध्द आणि “सर्वश्रृत” आहे. कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील इ.स. 15 व्या शतकातील एक प्रमुख संत कवयित्री होउन गेल्या. संत कान्होपात्रा यांचा जन्म पंढरपुर पासून २२ किमी वर असलेल्या मंगळवेढा या गावी एका गणिकेच्या पोटी झाला. शामा या नाचगाणं करणाऱ्या गणिकेकडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते. अनेक धनदांडग्यांना