चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची… (भाग - ४)

(14)
  • 10.6k
  • 4.4k

आज मुग्धाला खूपच अस्वस्थ वाटत होते. तिला सतत हर्षचे शब्द आठवत होते. आताच कुठे त्या दोघांच्या मैत्रीला छान सुरुवात झाली होती. तिला त्या दोघांची मैत्री खूप आवडायला लागली होती. पण हर्ष मधेच असं काही तिला बोलेल याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. मुग्धाला शाळेत जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. पण परीक्षा लवकरच सुरु होणार असल्याने तिला अभ्यासाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नव्हते. म्हणून नाईलाजाने ती शाळेत जाण्यास निघाली. तर इकडे हर्षचीही अवस्था फार काही वेगळी नव्हती. मुग्धाच्या नकारामुळे तो पूर्ण खचला. त्याला खूप उदास वाटायला लागले. घडलेल्या प्रकारामुळे मुग्धा आता कधी त्याच्याशी बोलेल कि नाही याची त्याला भीती वाटू लागली. आपण मुग्धाला