जोडी तुझी माझी - भाग 30

(13)
  • 11.9k
  • 1
  • 5.7k

फोन ठेऊन तो परत गौरवीच्या खोलीत येतो, गौरवी शांत झोपली असते आणि रुपाली तिच्या बाजूनी बसून पुस्तक वाचत असते...आज त्याच हृदय आक्रंदत असतं, गौरवी असा काही विचार करेल अस त्याला वाटलंच नव्हतं, चिढली आहे, रागात आहे, काही दिवसांनी राग शांत झाला की बोलेल माझ्याशी ऐकून घेईल मला असंच त्याला वाटत होतं...त्याला रुपलीशी बोलायचं असतं, म्हणून तो तिला बाहेर बोलावतो..विवेक - तू आत गेल्यावर काही बोलली का गौरवी तुझ्यासोबत??रुपाली - अ.. हो मी तिला विचारलं की तू रस्त्यावर काय करत होतीस?विवेक - मग... काय बोलली ती?रुपाली - तिने त्या हॉटेलमध्ये तुम्हाला बघितलं होत आणि भावनेच्या भरात तुमच्याकडे पळत सुटली इकडे तिकडे