जोडी तुझी माझी - भाग 15

(12)
  • 12.8k
  • 1
  • 6.8k

गौरवी किचन आवरत असते तेवढ्यात विवेक चोर पावलांनी येऊन तिच्या मागे उभा राहतो.. ती तिच्या कामात मग्न असते आणि घरातही शांतता असते. तो हळूच तिच्या कान जवळ आपलं चेहरा नेतो आणि हलक्या आवाजात "गौरवीss " म्हणतो पण ती मात्र घाबरून जोरात ओरडते आणि वळायला जाते, त्याचा धक्का लागून पडणार तोच तो तिला सावरतो आणि घाबरल्यामुळे गौरवी पटकन त्याच्या मिठीत शिरते... 2 मिनिट तिला काही सुचतच नाही ती तशीच विवेकच्या मिठीत असते पण भानावर आल्यानंतर मात्र त्याला जोरात लांब लोटते आणि त्याला ओरडते....गौरवी - अस कुणी करतं का? मी किती घाबरले माहिती आहे...विवेक - हो माहिती आहे तू मिठी मारली तेव्हा