जोडी तुझी माझी - भाग 14

(16)
  • 11.3k
  • 6.8k

आणि ते दोघेही घरी परत जायला निघतात.दोघेही सोबत घरी पोचतात, रात्रीच्या जेवणाची वेळ झाली असते त्यामुळे दोघांनाही भुकेची जाणीव होते. गौरवी - विवेक 15 मिनीट दे फक्त मी लगेच गरम पोळ्या करते आणि मग जेवायला वाढते. विवेक - मी मदत करू का काही? म्हणजे अग 15 मिनिटांमध्ये कसा काय स्वयंपाक होणार?गौरवी - आपण बाहेर जायच्या आधीच मी सगळी तयारी केली होती बस भाजी फोडणी घातली आणि पोळ्या केल्या की झालं... आणि हो बरा झाला ना की मग करशील मदत आता जरा आराम कर..विवेक - जशी आज्ञा राणीसाहेब... गौरावीला विवेकच्या अश्या बोलण्याचं हसूच येतं... गौरवी - काहीतरीच हा आता हे ... जा आराम कर झालं