जोडी तुझी माझी - भाग 13

(14)
  • 12.8k
  • 7k

घराच्या जवळच अगदी एक खूप छान गार्डन असतं. डॉक्टर निघून गेल्यानंतर गौरवी आणि विवेक तयार होतात आणि त्याच गार्डन मध्ये जातात. तिथे एक बेंचवर बसून दोघेही जण गार्डन ची सुंदरता न्याहाळत असतात. बोलायचं असत पण शब्द सुचत नाहीत.इकडे तिकडे बघता बघता अचानक दोघांची नजरानजर होते आणि क्षणभरासाठी दोघेही एकमेकांत गुंतून जातात. पण लगेच भानावर येत तो नजर फिरवतो आणि पुन्हा इकडे तिकडे बघू लागतो. तीने मात्र तिची नजर त्याच्यावरच रोखून ठेवली असते. त्याची चलबिचल बघून तीच सुरुवात करते,गौरवी - विवेक, तू काही विचारणार होतास ना? विचार न मग.विवेक - अ... अ.. हो म्हणजे अग गेले 8 दिवस घरी राहून मला