कादंबरी - प्रेमाची जादू भाग-२०

  • 8.7k
  • 3.8k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- २० वा -------------------------------------------- यशकडे मिळालेली नोकरी सोडून देण्यापेक्षा , सकाळचे ८ ते १२ कॉलेज झाल्यावर .. दुपारी २ ते ७ असे पाच तास यशच्या ऑफिस चे काम केले तर चालेल का ? नाही तरी नवख्या मधुराकडे कस्टमर attend करणे हे जबाबदारीचे काम नव्हते , त्यामुळे बील ,पेमेंट , ऑफिस रेकॉर्ड , बँक रेकॉर्ड ..असे स्वरूपाचे काम दुपारच्या वेळेत केले तरी चालण्यासारखे होते . मधुराने यशला ही विनंती केली ..तेव्हा यशने मेनेजरकाकांना केबिनमध्ये बोलावत म्हटले – काका –ही मधुरा काय म्हणते आहे ,तिचे ऐकून घ्या ,आणि त्यवर तुमचे काय मत आहे ते सांगा , योग्य की