जोडी तुझी माझी - भाग 12

  • 12.8k
  • 2
  • 7.4k

विवेक आणि गौरवी परत दोघेच होते रूम मध्ये. गौरवी - तु काही खाल्लं नाहीय ना तर मी ज्यूस घेऊन येऊ का तुझ्यासाठी? भूक लागली असेल ना. आले मी लगेच तोपर्यंत आराम कर. विवेक - हो पण 2 आणशील हं. गौरवी - बर ठीक आहे. ती लगेच हॉस्पिटलमधून बाहेर गेली आणि जवळच्या मार्टमधून 2 फ्रेश जूस घेऊन आली. विवेक तिचीच वाट बघत होता. गौरवी - अरे आराम करायचा ना थोडा. (आणि जुस त्याच्या हातात देत) घ्या हा झाला की दुसरा देते. विवेक - मला एवढंच पुरे होतो, दुसरा जूस मी तुझ्यासाठी मागवला होता, मला माहिती आहे तू ही काही खाल्लं नसणार