क...ळलं एक.....दाचं

  • 7.5k
  • 2.1k

क.......ळलं एक.........दाचं सौ.लता भुसारे ठोबरे मी शाळेतून रुमवर आलो तर महे दादा आगुदरंच रुमवर येऊन खुर्चीवर,एक पाय वर घेऊन आनी एक पाय खाली सोडून डोक्याला हात लावून बसले होते.जनू काही सर्व जगाचे ओझे त्यांच्यावरंच असावे असा त्यांचा चेहरा पडला होता.जसं काही ट्र्प तात्यानं फोन करून त्यांना जगावरील एखाद्या मोठ्या संकटावर उपाय मागितला होता आनी आजी बिचारी एका कोनंट्यात आवघडून उभी होती.ती मला राज ठाकरे समोर उभ्या असलेल्या एखाद्या भय्यासारखी वाटली.मला बघताचं दादा घाईघाईनं उठले आनी मला म्हणाले "ये माध्या ठेवं रं ते दप्तर आन् चल बिगिनं" "कुटं जायचं?" "तुला कशाला चौकशा,गोसायाच्या शेंडीची चौकशी कशाला