पाच रुपये - 1

  • 8.7k
  • 1
  • 3.5k

आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये बसून जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो रेल्वे स्टेशनला चला म्हणून ऑटोमध्ये बसून घेतलं. ऑटोत बसल्याबरोबर जोराचा पाऊस सुरू झाला. ऑटोमध्ये बसून देखील त्याच्या अंगावर पावसाचे पाणी पडतच होतं. पाऊस तसं खूप जोरदार पडत होता. काही वेळात तो रेल्वे स्टेशनवर पोहोचला. जोरात पाऊस चालूच होता पण ऑटो मधून उतरणे गरजेचे होते. सोबत छत्री नव्हतं आणि पावसात भिजत स्टेशनमध्ये जाण्याशिवाय पर्याय देखील नव्हता. ऑटोमधून उतरून धावत-पळत पावसात भिजत कसेबसे स्टेशनमध्ये पोहोचला. पाऊस मोठा असल्याने एका मिनिटात पावसाने त्याला ओलेचिंब