सगळे शशांककडे जायला निघतात..... शशांकने ऋषीच्या आई - बाबांना सुद्धा बोलावलं असतं....कारण, त्याची दुसरी फॅमिली तेच असतात.......अर्णव, श्रेयस आणि श्रीकांत सुद्धा येणार असतात.....सगळे जमतात....... अमायरा जाताक्षणी सगळ्यांच्या पाया पडते.....हे बघून शशांकचे बाबा..... सुखावतात.....?... सगळे बसतात.... अमायराला शशांकचे बाबा काही प्रश्न विचारणार असतात..... शशांक चे बाबा : "बेटा......तूझे कपडे, राहणीमान आमच्यापेक्षा वेगळं आहे....मग तुला वाटतं तू, आमच्यात निभावून नेऊ शकतेस.....?" अमायरा : "बाबा......मी वेगळे कपडे घालते, माझं राहणीमान निश्चितच आपल्यातील नाही.....पण, त्याचा आणि माझ्या तुमच्यासोबत असणाऱ्या व्यवहाराचा, काहीही संबंध मला तरी दिसत नाही.....बाबा, मी कपडे कसेही घालत असली.... पण, मोठ्यांचा मान राखण मला माझ्या आईंनी शिकवलंय..... मोठे आपल्यापेक्षा मोठेच असतात....हे मी