शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याचा ठराव जिल्हा परिषदेत पारित करण्यात आला हे वृत्त वाचल्याबरोबर रामराव गुरूजीच्या छातीत धस्सं केल. आज काही तरी अवघड बातमी वाचायला मिळणार याची गुरूजीला खात्री होती. कारण आज जिल्हा परिषदेत शिक्षण विभागासाठी फक्त खास बैठक बोलाविण्यात आली होती आणि त्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविता यावी यासाठी विविध उपाय योजनेवर चर्चा अपेक्षित होती. झाले ही तसेच शिक्षक मंडळी मुख्यालयी म्हणजे शाळेच्याच गावात राहिल्याशिवाय शाळा सुधारणार नाही आणि विद्यार्थ्याची गुणवत्ता सुद्धा, त्यासाठी शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्याचा ठराव सर्वांच्या संमतीने पारित करण्यात आला. तीच बातमी प्रत्येक पेपरच्या मुखपृष्ठावर प्रकाशित झाली होती. शाळा सुरूवात होवून आठवडा सुद्धा