चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ३)

(13)
  • 10.6k
  • 4.8k

आज मुग्धाला शाळेत जायला थोडा उशीरच झाला. तिच्या सगळ्या मैत्रिणी पुढे निघून गेल्या. ती घरातून बाहेर पडली आणि एकटीच शाळेच्या दिशेने निघाली. थोड्याच अंतरावर पोहचताच नेमका हर्ष त्याच्या बिल्डिंग मधून बाहेर आला. मुग्धाचे अचानक लक्ष गेले आणि दोघांची नजरानजर झाली. दोघांमध्ये फक्त एक - दोन फुटाचे अंतर असल्यामुळे एकमेकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत होते. त्याला पाहताच मुग्धाच्या तोंडावर बारा वाजले तर तिला इतक्या जवळून पाहता आले म्हणून हर्षचा चेहरा खुलला होता. तिला न्याहाळून हर्ष मान खाली घालून शाळेच्या दिशेने निघून गेला. पण मुग्धा मात्र तिथेच स्तब्ध उभी राहिली. काही अंतरावर तो पुढे गेल्याची खात्री झाल्यावर मुग्धा पुन्हा चालू लागली. चालताना