चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - २)

(11)
  • 10.6k
  • 1
  • 5.2k

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा शाळा सुरु झाली. तिसरा तास ऑफ असल्यामुळे वर्गातील सगळी मुले आज मैदानावर खेळत होती. मुग्धा आपल्या मैत्रीणींसोबत दिवाळीच्या सुट्टीतील गमतीजमती सांगत होती. त्यांच्या गप्पा अधिकच रंगल्या होत्या. तितक्यात मुग्धा त्या तरुणाला पुन्हा बघते. तो अजूनही फक्त तिलाच बघत असल्याचे तिला कळते. मुग्धा तिची खास मैत्रिण स्नेहलला हळूच इशाऱ्याने त्या मुलाकडे खुणावते. स्नेहलचे त्याच्याकडे लक्ष जाताच तो मुलगा गांगरून तिथून निघून जातो. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने त्या दोघी (मुग्धा आणि स्नेहल) मैत्रिणींच्या ग्रुप मधून बाहेर निघतात. मुग्धा घडलेला सगळा प्रकार स्नेहलला सांगते. "मुग्धा, अंग हा तर हर्ष !" स्नेहल म्हणाली."काय !! तू या मुलाला ओळखतेस ? " मुग्धा