कोरोना व्हायरस शिक्षकदिन व शिक्षकाचीच सत्वपरीक्षा

  • 10.2k
  • 2.5k

24. कोरोना व्हायरस;शिक्षकदिन व शिक्षकाचीच सत्वपरीक्षा दि. ५ सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. कारण ते आधी शिक्षक होते. पण ते पुढे देशाचे राष्ट्रपतीही बनले. त्यामुळे साहजिकच शिक्षकांचा सन्मान वाढला. म्हणून त्यांच्या जन्मदिवशी शिक्षकांचा सन्मान म्हणून हा दिवस सा-या भारतभर शिक्षकदिन म्हणून साजरा करतात. शिक्षकदिन म्हणून हा दिवस साजरा करीत असतांना या दिवशी विद्यार्थी स्वतः शिक्षकांचा वेष परिधान करुन शाळेत येतात. शिक्षकांना आराम देतात. तसेच त्यांना एखादं पुष्प देवून वा एखादं बक्षीस देवून ते विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान करतात. तसेच त्या शिक्षकांना एक दिवस का होईना आराम देवून स्वतः शिकवीत असतात. सध्या