18. भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्याने दरवर्षी देशात स्वातंत्र्यदिन साजरा होतो. लोकं तोरणा पताका लावून स्वातंत्र्यदिन साजरा करतात. मग हा दिवस साजरा करीत असतांना कोणी गालावर तिरंगा काढतात. कोणी हातावर तर कोणी चक्क डोक्याचे केस कर्तन करीत स्वातंत्र्यदिनाचा आनंद दाखवतात. सगळा आनंद..... चिकार आनंद...... स्वातंत्र्यदिन साजरा करणे ही काही दाखवायची वस्तू आहे का की त्या स्वातंत्र्याला जे अभिप्रेत आहे. त्यानुसार वागण्याची गरज आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करीत असतांना काही तर असा आव आणतात की जणू त्यांनीच देश स्वातंत्र्य करतांना झुंज दिली. बाकीचे लढलेच नाही. आम्ही स्वाचंत्र्यदिन साजरा करतो. करायला पाहिजे. पण हा स्वातंत्र्यदिन केवळ साजरा करुन चालत नाही तर त्यानुसार वागलोही पाहिजे. तेव्हाच