'मन तेरा जो रोग है sssss , मोहें समझ ना पायें , पास है जो सब छोड के , दू sss र को पास बुलाए !...जिया लागे ना तुम बीन मोरा , …. ,.कॉफी चा मग हातात घेऊन खिडकीत शून्यात बघत बसलेल्या सुप्रियाला गाण्याच्या शब्दांनी एकदम जर्क बसला, आधीच हुरहुर दाटून आलेल्या मनाला शब्द आणि सूर सापडले तशी ती आणखीनच उदास झाली ,..'या रेडिओ वाल्याना कसं बरोब्बर कळत आपल्या मनात काय खळबळ चाललीये ,अगदी शोधुन गाणी लावतात " एक सुस्कारा टाकून हातातली कॉफी संपवून , ती रोजच्या कामाला लागली ,सकाळीच असा उदास झालेला तिचा सगळा दिवस मग कोमजलेला गेला ,