मुलगी झाली हो ....

  • 7.8k
  • 1
  • 2k

गावातील सगळ्या लोकांना पेढे वाटत रामराव मोठ्या आनंदाने बोलत सुटला "मुलगी झाली हो... मुलगी झाली हो... " लोकांनी सुद्धा तेवढ्याच आनंदात त्‍याचे पेढे घेत होते आणि त्‍याचे अभिनंदन ही करत होते. बरं झालं एकदाचं रामरावच्‍या घरात मुलगी आली असे लोकं एकमेकांना बोलू लागली. कारणही तसेच होते. रामरावाच्‍या मागील सात पिढ्यात मुलगी जन्‍मालाच आली नव्‍हती. तेव्‍हा रामरावला मुलींच्‍या या जन्‍माने अत्‍यानंद झाला परंतु त्‍यासाठी पाच मुले जन्‍माला घालावी लागली. गावात रामरावाला पांडवाचे वडील पंडू आणि त्‍याची पत्‍नी जानकी हिला पांडवांची आई कुंती या टोपणनावानेच ओळखले जायचे. आज त्‍यांच्‍या घरात मुलींच्‍या रूपात साक्षात लक्ष्‍मीच आली. मुलगी व्‍हावी म्‍हणून त्‍यांचा लक्ष्‍मीदेवीला नवस ही