चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - १)

(14)
  • 17.6k
  • 1
  • 7.3k

शाळा सुटण्याची घंटा झाली. मुग्धा अगदी पळतच घराच्या दिशेने निघाली. रोज मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी करत घरी जाणारी मुग्धा आज अचानक कोणालाही काहीच न सांगता निघाली म्हणून सगळ्या मैत्रिणी तिच्यावर खूप रागावल्या होत्या. पण मुग्धाने आज कोणाचाही विचार केला नाही, त्याला कारणही तसेच होते... मासिक पाळी !!! चौदा वर्षांची मुग्धा नववीमध्येच होती. कोवळंच वय ते ! इतिहासाचा तास सुरूच होता आणि अचानक तिला अस्वस्थ वाटू लागले. आपल्यासोबत पहिल्यांदाच असे काहीतरी होत आहे, असे तिला जाणवू लागले. त्यामुळे जशी शेवटच्या तासाची घंटा झाली तशी तिने धूम ठोकली. घरी पोहचल्यावर तिने घडलेला सारा प्रकार आईला सांगितला. आईने मागून पुढून मुग्धाला अगदी नीट