सुटका पार्ट 8

  • 8.2k
  • 1
  • 3.3k

सुंदर माडाच्या रांगा पसरल्या होत्या. पलीकडून आमराईच सुंदर दर्शन होतं होतं. सकाळची गुलाबी थंडी अजून ही ओसरली नव्हती. हलकं हलकं धुकं रस्त्यावर पसरलं होतं. कोवळं ऊन उबदार वाटत होतं. लांबून मोरांच्या म्याव म्यावचा आवाज. त्यात किलकीलणारी पाखरं वातावरण प्रसन्न करत होती. सुंदर वाटत होतं कसं सगळं. “सुरे ऐकतेस का? तुला आठवत का गं? आपण सोबत जेवायला बसलो तर तू माझा डब्बा आणि सोबत तुझा डब्बा सुद्धा संपवायची. तरी एवढी बारीक कशी दिसतेस ग?” “म्हणजे फक्त बारीकच दिसते, साडी कशी आहे सांगितलं नाही?” मी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत प्रश्न केला. “साडी ही छान आहे.” त्याने तोळ्यावर मोजून देतात तस कौतुक केलं