रामा जेवण ठेऊन लगबगीने निघून ही गेला. मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात मी जेवण केलं. पण मोबाइललाला रेंज नाही आणि त्यात हा ही बाहेर गेला होता. त्या वातावरणात जरा भीतीची लहर उमटली. “लोढू, तू बाहेर आहेस का?” फक्त रातकिडे किरकिरण्याचा आवाज येत होता. थकलेली असूनही मला झोप येईना म्हणून प्रवासात घेतलेलं पुस्तक वाचायला घेतलं. पण पुस्तकात माझं लक्ष लागेना. रातकिड्यांची कीरकिर आणि दूरवर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. रम्य वाटणार सगळं अचानक भयाण वाटायला लागलं. बाहेर काहीतरी आवाज झाला तस काळजात धस्स झालं. “कोणी आहे का बाहेर?” कुठलीच प्रतिक्रिया नाही. काय यार हा कुठे गेला.? किती काळोख आहे हा? एवढी मोठी खोली