सुटका पार्ट 6

  • 8.3k
  • 1
  • 3.4k

“बघतेयस ना? आवडला का? माझ्या आजोबांच्या वडिलांनी खास बनवून घेतलेला हा वाडा, जुना आहे खूप, सध्या विकायचं चाललंय. येत असं तो अधून मधून छान वाटत गाव, तसही माझ्या शिवाय याला कोणी वारस नाही. पण मला हा विकायची इच्छा होतं नाही.”“ये, अगं उभी काय आहे? ये इकडे तुला खोली दाखवतो तुझी. इथे मात्र ऐसपैस रूम्स आहेत पूर्ण वाड्यात अश्या नऊ खोल्या आहेत. चलचल आपल्याला अजून खूप गोष्टी बघायच्या आहेत.”त्याने माझी बॅग घेऊन आत येण्याची खूण करत तो पुढे निघाला.“सावकाश ये. पडशील. पायऱ्या मोठ्या आहेत पण लाकडी असं ल्याने पाय सरकतो. अगं मी एकदा सोडून दोनदा पडलो आहे तिथून.” तो बोलत होता