सुटका पार्ट 3

  • 9.7k
  • 4.5k

माझ्या टोमण्यांना हसून उत्तर देणार आणि मी केलेल्या सगळ्या मस्कर्‍या हसून नेणारा माझा आता पर्यंतचा पहिला मित्र, जो मला अजून पर्यंत कधीच खडूस म्हटले नाही किंवा माझ्या स्वभावाला वैतागून माझ्याशी भांडण केले नाही, मी त्याच्या समोर बहुली दिसायचे, मोटू-पतलूची आमची जोडी प्रसिद्ध झाली ती या कारणाने की मी कोणाची तरी खोडी काढणार आणि आमचा साजूक लोढू जाऊन त्याला सॉरी म्हणणार हे मात्र आता सोबत रोजच झालं होतं. आमच्या मागच्या बाकावर बसणारा गौऱ्या ही आमच्यात सामील असायचा पण मला मात्र आमच्यात लुडबुड केलेलं आवडायचं नाही, तसाही तो जरा जास्त हुशार आणि शिक्षकांच्या जवळचा होता, कडीमोडा धापणा अवतार मला अजिबात आवडायचा नाही.