विवेकला थोडं शांत झाल्यावर जाणवत की उगाच चिढलो आपण तिच्यावर. तिला खुश ठेवायला हवं नाहीतर तिला संशय येईल उगाच. म्हणून तो परत खोलीत येतो. गौरवी दरवाज्याकडे पाठ करून बेडवरच्या कपड्यांच्या घड्या घालत असते.विवेक - गौरवी ऐक ना, i m sorry मी उगाच चिढलो तुझ्यावर.त्याच बोलणं ऐकून गौरवीचा राग कुठल्या कुठे पळून जातो, त्याने स्वतःहून बोलावं हेच तर तिला हवं होतं कालपासून. पण ती काहीच बोलत नाही. त्याच बोलणं ऐकून पुन्हा आपलं काम करत राहते.विवेक - खरतर मी आई बाबांना सोडून कधी कुठेच गेलेलो नाही, आणि आता सरळ परदेशात जातोय, खूप सवय आहे मला त्यांची आणि काळजी ही वाटते कारण ते