कोरोना व्हायरस आला श्रावण गेला श्रावण

  • 9.3k
  • 2.2k

16. कोरोना व्हायरस;आला श्रावण गेला श्रावण श्रावण महिना आला. सुखसमृद्धी आणेल असं वाटलं. कारण आधीच कोरोनानं जनता त्रस्त होती. त्यामुळं राहत मिळेल असं वाटत होतं. शाळा सुरु होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान टळेल असंही वाटलं. पण लोकांचा भ्रमनिराश झाला. कारण लोकांना श्रावण उजळूनही राहत मिळाली नाही. विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु झाल्या नाही. त्यातच ब-याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत असलेलं दिसत आहे. विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासाबाबत शिकविण्याचा विचार केल्यास असं जाणवत आहे की शिक्षकांनी ऑनलाइन शिकविणे सुरु केले आहे. त्यातच मोबाईलवर मुले शिकत आहेत. पण ज्यांच्याकडे मोबाईलच नाही त्यांची गोची होतांना दिसत आहे. त्यांच्या अभ्यासाचं होणारं नुकसान कसं भरुन निघेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. शिक्षक अभ्यास