"दादा... ए दादा! तुझी देवसेना ओरडू लागली रे, जरा बघ तिच्याकडे ! स्नेहाचा फोन आलाय वाटतं. काय बाई ह्याची रिंगटोन!""उचल ना मग तू. सोनूला सांग करतो 15 मिनिटात." अंघोळ करता करता विश्वास आईला सांगत होता. देवसेना म्हणजे बाहुबली 2 मध्ये तिच्या एन्ट्री सीनला जी धून वाजते ना ती धून ह्याच्या आवडीची. फक्त जेव्हा स्नेहाचा फोन यायचा तेव्हाच ही रिंगटोन वाजायची. आईलाही स्नेहा आणि विश्वासचं प्रेम माहिती होतं. तिची पूर्ण संमती होती त्यांच्या लग्नाला. अंघोळ करून आल्यावर त्याने सर्वांत आधी स्नेहाला फोन लावला. "हॅलो, हा सोनू बोल! अरे अंघोळ करत होतो रे बाळा. म्हणूनच नाही उचलला फोन." "हो रे ऐकलं.... आत्या सांगत होत्या. विशु अंघोळीला