कादंबरी -प्रेमाची जादू -भाग-१९

  • 8.1k
  • 4k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग -१९ वा -------------------------------------------------------------------------------- १. काही दिवसापासून यश मनाशी खूप काही ठरवत होता ,पण त्याच्या मनातले विचार प्रत्यक्ष्य कृतीत येऊ शकत नव्हते कारण घरच्या आघाडीवर काही ना काही कार्यक्रम होऊ लागल्यामुळे त्याच्या सुटीचे दिवस भुर्रकन जात होते . अशाच घाई-गर्दीत त्याच्या मित्राचा फोन येऊन गेला .. त्यात मित्रांने यशला सावधगिरीचा इशारा देत म्हटले होते ..की .. तू तुझ्या माणसावर लक्ष ठेवून आहेस अस अजिबात संशय येऊ देऊ नकोस ,हुशारीने काम कर , तुझ्याकडे कामाला असलेल्या माणसात एक संभावित चोर घुसून तुला नुकसान पोन्च्वीत आहे,हे तुला दिसेल . इतक्या वर्षात यशच्या बाबतीत असे पहिल्यांदा घडत होते .